
कुंभवली येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर
बोईसर, ता. २५ (बातमीदार) : न्यूक्लीअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व अल्मिको या कृत्रिम साधने पुरवणाऱ्या संस्थेतर्फे कुंभवली-एकलारे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या वेळी २३७ ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला. न्युक्लीअर कॉर्पोरेशनच्या सीएसआरचे प्रमुख केदार भावे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी कंबरदुखी, दात, पाठदुखी, मानेचा त्रास, पायाचा त्रास तसेच अन्य आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते कुंदन संखे, कुंभवली-एकलारे गावाच्या सरपंच ॲड. तृप्ती संखे, न्युक्लीअर कॉर्पोरेशनचे बळवंत कोरे, कुंभवलीचे उपसरपंच अमित संखे, सदस्या सोनाली संखे, तेजल संखे, वासंती संखे, अश्विनी संखे, दिव्या संखे, राहुल संखे, आकाश संखे, डॉक्टर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.