ऐन संक्रांतीच्या तोंडावर तिळगूळ महागला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐन संक्रांतीच्या तोंडावर तिळगूळ महागला
ऐन संक्रांतीच्या तोंडावर तिळगूळ महागला

ऐन संक्रांतीच्या तोंडावर तिळगूळ महागला

sakal_logo
By

जव्हार, ता. २५ (बातमीदार) : तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण आदिवासी भागांमध्ये मकरसंक्रांत सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. वर्षाचा हा पहिला सण असल्याने नागरिक नातेवाईक मित्रपरिवाराला तिळगुळ देऊन स्नेह व्यक्त करीत असतात. परंतु यंदा संक्रांतीच्या तोंडावरती तीळ महागल्याने तिळगुळाचा गोडवा कमी झाला आहे. कारण यंदा तिळाच्या किमतीत १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.
मकर संक्रांतीला तिळगुळाला अनन्यसाधारण महत्त्व असते. तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा प्रत्येकाच्या जीवनात यावा म्हणून या दोन वस्तूंपासून बनलेल्या पदार्थाची देवाण-घेवाण करण्याची परंपरा आहे. तालुक्यात तिळाचे उत्पादन नसल्याने इतर शहरातील तिळाची विक्री होते. पण यंदा तिळाचा दर २४० ते २७० रुपये किलो इतका पर्यंतचा भाव मिळतो आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. तर मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुळाची मागणी वाढते. मात्र यंदा गुळाचे भाव स्थिर आहेत, असे जव्हार बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सांगितले.
....
सेंद्रिय गुळाला मागणी
मकर संक्रांतीनिमित्त गुळाच्या मागणीत वाढ होते. यंदा बाजारात गूळ ५५ ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. तर रासायनिक गुळापेक्षा सेंद्रिय गुळाचा भाव १५ ते २५ रुपयांनी अधिक आहे. पण मकर संक्रांतीनिमित्त सेंद्रिय गुळाची मागणी वाढली आहे.
....
मकर संक्रांतीनिमित्त तीळ आणि गुळाला विशेष महत्त्व असते. यंदा रासायनिक गुळापेक्षा सेंद्रिय गुळाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच तिळाच्या दरात १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.
- रियाज मेमन, व्यापारी, जव्हार

वस्तूंचे भाव (प्रतिकिलो)
तीळ २४० ते २७०
गूळ ५५ ते ८०
साखर ४० ते ४५