म्हसा यात्रेत भरणार जनावरांचा बाजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हसा यात्रेत भरणार जनावरांचा बाजार
म्हसा यात्रेत भरणार जनावरांचा बाजार

म्हसा यात्रेत भरणार जनावरांचा बाजार

sakal_logo
By

सरळगांव, ता.२५ (बातमीदार) : सरकार दरबारी केलेल्या मागणीला यश आल्याने कोरोनामुळे सलग दोन वर्ष होऊ न शकलेली म्हसा यात्रा जनावरांच्या बाजारासह यंदा होणार असल्याने यात्रेकरूंकडून आनंद व्यक्त केला जात आहे. लम्पीच्या आजाराने सर्वच ठिकाणांचे जनावरांचे बाजार बंद असल्याने यावर्षाची म्हसा यात्र जनावरांच्या बाजाराविनाच होईल, अशी जोरदार चर्चा सुरू झाल्याने व्यापारी वर्गात नाराजी होती. म्हसा यात्रेत जनावरांचा बाजार भरणारच, असे आश्वासन आमदार किसन कथोरे यांनी दिले होते. यानुसार राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे म्हसा यात्रेत जनावरांचा बाजार भरण्यासाठी परवानगी मिळावी, म्हणून लेखी पत्र देऊन मागणी केली होती. या मागणीला यश आले असून मंत्री पाटील यांनी सहमती दर्शवल्याने आनंदांचे वातावरण आहे.