ठाण्यात जबरी चोरी आणि घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात जबरी चोरी आणि घरफोडी
ठाण्यात जबरी चोरी आणि घरफोडी

ठाण्यात जबरी चोरी आणि घरफोडी

sakal_logo
By

ठाणे, ता. २५ (वार्ताहर) ः ठाण्यात एकाच दिवशी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. इमारतीत जिने चढणाऱ्या महिलेचे दागिने लुटल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) वर्तकनगर येथे घडली; तर खिडकीवाटे प्रवेश करून लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरांनी पोबारा केल्याची घटना समतानगर येथे घडली. या दोन्ही घटनेत मिळून ६ लाख ६० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरला आहे.

वर्तकनगर लोकमान्यनगर पाडा नं. १ येथील माहेश्वरी अपार्टमेंटमध्ये राहणारी एक महिला इमारतीचे जिने चढून जात होती. तेव्हा एका अज्ञात चोराने महिलेचे दागिने खेचून पोबारा केला; तर समतानगर येथील अरविंद घोसाळकर यांच्या घरी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरने प्रवेश करून सोनेचांदीचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली. याची किंमत ५ लाख १८ हजार ७५० रुपये इतकी आहे. दोन्ही घटनांना तपास पोलिस करत आहेत.