दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू
दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

sakal_logo
By

शहापूर, ता. २५ (बातमीदार) ः मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारने महामार्गालगत असलेल्या कठड्याला जोरदार धडक दिल्याने कारमधील नितीन पट्टेबहादूर (वय ५१) यांचा जागीच मृत्यू झाला; तर प्रवीण पट्टेबहादूर व कारचालक मोहन पडघान हे किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी मोहन पडघान या चालकावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावर आटगावजवळ हा अपघात घडला; तर खर्डीजवळ एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार मनोज रामप्रकाश सिंग (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला.