Mon, Jan 30, 2023

वाघाडी जंगलात खैराची चोरी पकडली
वाघाडी जंगलात खैराची चोरी पकडली
Published on : 26 December 2022, 12:05 pm
कासा, ता. २६ (बातमीदार) : वन विभाग डहाणूमधील वनपरिक्षेत्र कासाच्या कर्मचाऱ्यांनी वाघाडी येथे धाड टाकून अवैध खैर चोरी पकडली. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून शनिवारी वन विभागाच्या पथाने वाघाडी येथे सापळा रचला होता. तेव्हा पहाटे चार वाजता एक टेम्पो त्यांना येताना दिसला. या टेम्पोची तपासणी करत असताना चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन वाहन सोडून जंगलात पसार झाले. यात वाहनात खैराच्या लाकडाचा साठा आढळला. या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिमंडळ अधिकारी व्ही. एच. चांदगुडे करत आहेत.