भरधाव दुचाकीची टँकरच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरधाव दुचाकीची टँकरच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू
भरधाव दुचाकीची टँकरच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

भरधाव दुचाकीची टँकरच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : मालाड परिसरात वेगवान दुचाकीची टँकरला धडक बसल्याने अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. मालाड पश्चिमेकडील कांचपाडा येथील रामचंद्र एक्स्टेन्शन रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरला भरधाव दुचाकीने रविवारी (ता. २५) सकाळी धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांना कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब शताब्दी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुचाकी चालक आणि सहप्रवाशानेही हेल्मेट घातलेले नसल्याचे पोलिस तपासादरम्यान समोर आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघे मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. या अपघातप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.