Mon, Feb 6, 2023

गळफास घेऊन एकाची आत्महत्या
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
Published on : 26 December 2022, 12:24 pm
मानखुर्द, ता. २६ (बातमीदार) : मानखुर्दच्या पीएमजीपी वसाहतीतील स्वप्नपूर्ती ए-२ या इमारतीमध्ये इमरान खान (वय ४४) याने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी मानखुर्द पोलिसांनी धाव घेत इमरानला उपचारार्थ राजावाडी रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला. कौटुंबिक कलहातून आलेल्या नैराश्यामुळे इमरानने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याने पत्नीला माहेरी पाठवून दिले होते. त्यामुळे तो घरी एकटाच होता. राहत्या घरी इमरानने गळफास घेऊन आत्महत्या केली.