कोकुयो कॅम्लिन एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचा हीरक महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकुयो कॅम्लिन एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचा हीरक महोत्सव
कोकुयो कॅम्लिन एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचा हीरक महोत्सव

कोकुयो कॅम्लिन एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचा हीरक महोत्सव

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : कोकुयो कॅम्लिन एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचा हीरक महोत्सवी सोहळा शनिवारी शिवाजी मंदिरात उत्साहात पार पडला. या वेळी कोकुयो कॅम्लिनचे अध्यक्ष दिलीप दांडेकर, कंपनीचे उपाध्यक्ष व सोसायटीचे अध्यक्ष श्रीराम दांडेकर, इंडियन मर्चंट्स चेंबरच्या माजी पदाधिकारी स्मिता दांडेकर उपस्थित होत्या. सोसायटीची स्थापना १९६२ मध्ये झाली होती, आज तिचे खेळते भांडवल चार कोटी रुपयांच्या आसपास असून, सोसायटीने सुमारे सव्वादोन कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची कर्जे दिली आहेत. संस्थेकडे ४० लाखांचा राखीव निधी असून त्यांना साठ वर्षे सतत लेखापरीक्षणाचा ‘अ’ वर्ग मिळाला आहे. हीरक महोत्सवानिमित्त आयोजित समारंभात दिलीप दांडेकर व श्रीराम दांडेकर यांनी सोसायटीच्या कामकाजाचा आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. सदस्यांच्या विश्वासामुळेच सोसायटीने आज ही मोठी मजल मारल्याचेही त्यांनी नमूद केले; तर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहण्याचे व्रत आवर्जून पाळू, असे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. याप्रसंगी प्रशांत दामले यांची मुख्य भूमिका असलेल्या, सारखं काही तरी होतंय, या नाटकाचा प्रयोगही झाला. या वेळी श्रीराम दांडेकर यांनी दामले यांचा तसेच संस्थेच्या काही माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. संस्थेचे कार्याध्यक्ष अमूल कंठी, मनीषा परब, विजय ठीक आदी पदाधिकाऱ्यांनी सोहळा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.