लाखो लिटर पाण्याची नासाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाखो लिटर पाण्याची नासाडी
लाखो लिटर पाण्याची नासाडी

लाखो लिटर पाण्याची नासाडी

sakal_logo
By

जुईनगर, ता.२६ (बातमीदार)ः रेल्वे स्थानकाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. या प्रकारामुळे स्थानक परिसरामध्ये दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असून सिडको प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
जुईनगर स्थानकाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला महिनाभरापासून गळती लागली आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने जुईनगर स्थानक परिसरामध्ये साचलेल्या पाण्यातूनच लोकल पकडण्यासाठीची धावपळ सुरू आहे. तर या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी तसेच डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. एकीकडे अनेक ठिकाणी लोक पाण्यापासून वंचित आहेत. मात्र, नवी मुंबई शहराला मुबलक स्वरूपात पाणी मिळत असल्यामुळे या पाण्याची किंमत नसल्याने स्थानकाबाहेरील या पाणी गळतीकडे पाहिल्यावर वाटत आहे. महत्त्वाचे म्हणजे, या गळतीबाबत सानपाडा विभागातील मनसेचे उपविभाग अध्यक्ष संजय पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे. पण जलवाहिनीच्या दुरूस्तीकडे अधिकारी मात्र टाळटाळ करत आहेत.
------------------------------------------------
स्थानकात पाण्याचा तुटवडा
या जलवाहिनीच्या पाण्याचा रेल्वे तिकीट घर, कार्यालये, उपहारगृह तसेच स्थानकाला उपयोग होतो. मात्र, सध्या जलवाहिनीच्या गळतीमुळे पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. विशेष म्हणजे, रेल्वे स्थानकांमध्ये सफाई करणारे कामगार तसेच प्रवाशांनी या गळतीबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
----------------------------
जलवाहिनीतील गळतीमुळे जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात पाय घसरून पडण्याची भीती वाटते. संबंधित अधिकाऱ्यांनी या जलवाहिनीचे काम लवकर पूर्ण करून वाया जाणारे पाणी वाचवावे.
-तृप्ती पवार, प्रवासी
--------------------------
स्थानक परिसरातील पाणी गळतीबाबत तक्रारी आल्या आहेत. लवकरच पाहणी करून प्रशासनाच्या परवानगीनुसार दुरुस्तीचे काम केले जाईल.
-मिलिंद रावराणे, कार्यकारी अभियंता, सिडको