
नवी मुंबईत कोरोनाचे सक्रिय तीन रूग्ण
वाशी, ता. २६ (बातमीदार) ः चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशात सतर्कता बाळगण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई शहरातही सद्यःस्थितीत कोरोनाचे फक्त तीनच सक्रिय रुग्ण असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे दिसत आहे.
कोरोनाची लाट पुन्हा येण्याची शक्यता असल्याने प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने शहरातील ऑक्सिजन प्लॅान्ट पुन्हा सक्रिय करण्याच्या सूचना दिल्या आहे. तसेच अनेक ठिकाणी मास्क वापरण्याचे देखील आवाहन करण्यात येत आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात रविवारी एक रुग्ण आढळून आला आहे. तर एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून मागील चार महिन्यापासून कोरोनाने मृत्यू झाल्याची देखील नोंद नाही. नवी मुंबईत आत्तापर्यंत २,०५७ रुग्ण कोरोनाने मृत्यू झाले आहेत. तर १ लाख ६५ हजार ८४१ जण बाधित झाले होते.