वाहनचालकांची फरफट अखेर निकालात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनचालकांची फरफट अखेर निकालात
वाहनचालकांची फरफट अखेर निकालात

वाहनचालकांची फरफट अखेर निकालात

sakal_logo
By

वाशी, ता.२६ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेकडून शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. यात एमआयडीसीतील रस्त्यांसोबतच शहराअंतर्गत वाहतुकीसाठी महत्त्वाच्या अशा चौकांचे देखील समावेश आहे. सध्यस्थितीला महापालिकेने २६ चौकांचे कॉंक्रीटीकरणाची कामे पूर्ण केली असून खड्ड्यांमुळे वाहनचालकांची होणारी फरफट अखेर निकालात निघाली आहे.
शहरात बेलापूर ते दिघ्यापर्यंत विविध विभागातील मुख्य तसेच शहराअंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. मात्र, वाहतुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या चौकांमध्ये पडणारे खड्ड्यांकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याने वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र कायम पहायला मिळते. त्यामुळे विनाअडथळा वाहतूक करण्याच्यादृष्टीने पालिकेकडून शहरातील ३५ चौकांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. सध्यस्थितीत २६ चौकांचे काँक्रीटीकरण पालिकेने पूर्ण केले आहे. तर उर्वरित काही चौकांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे करण्यात येत असून जवळपास ७० कोटींचा खर्च यावर करण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकांच्या काँक्रीटीकरणामुळे सततची होणारी वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार असून नवी मुंबईकरांचा प्रवास जलदगतीने होणार आहे.
---------------------------------------
कोंडीवर बऱ्याच अंशी नियंत्रण
नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात येणाऱ्या आठही विभागात नागरिकांची वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढणाऱ्या संख्येमुळे डांबरीकरण असलेल्या चौकांच्या ठिकाणी कायमच वाहतूककोंडी होत होती. सुरवातीला या चौकांमध्ये पेव्हर ब्लॉकच्या मदतीने खड्डे भरण्याचा प्रयत्न पालिकेच्या माध्यमातून येत होता. परंतु, ही कामे वारंवार करावी लागत असल्याने पालिकेने चौकांच्या कॉंक्रीटीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी झाल्याचे चित्र आहे.
----------------------------
काँक्रीटीकरणाचे नियोजन
एकूण काँक्रीटीकरणाचे चौक - ३५
पूर्ण करण्यात आलेले चौक - १९
गेल्यावर्षी काँक्रीटीकरण झालेले चौक - ७
यावर्षी पूर्ण होणारे चौक - ९
------------------------------------------------
शहरातील वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी शहरातील चौकांचे काँक्रीटीकरण महत्त्वाचे आहे. यामुळे पावसाळ्यात विविध चौकात पडणाऱ्या खड्ड्यांपासून मुक्ती तर मिळणारच आहे. पण वाहतूक देखील सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होणार आहे.
-अभिजित बांगर, प्रभारी आयुक्त, नमुंमपा
--------------------------------------------
मुंबई शहरातील रस्ते काँक्रीटीकरण करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर नवी मुंबई शहरातही मागील काही वर्षांपासून अनेक विभागातील चौक व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे.
-संजय देसाई, शहर अभियंता, नमुंमपा