विद्यार्थ्यांची स्वच्‍छता अभियान प्रभात फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांची स्वच्‍छता अभियान प्रभात फेरी
विद्यार्थ्यांची स्वच्‍छता अभियान प्रभात फेरी

विद्यार्थ्यांची स्वच्‍छता अभियान प्रभात फेरी

sakal_logo
By

शिवडी, ता. २६ (बातमीदार) ः नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य, सपोर्ट संघटना आणि मुंबई पब्लिक स्कूल, नारियलवाडी संकुल, सांताक्रूझ पूर्व शाळेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. २४) स्वच्छतेचा संदेश देण्याकरिता वाकोला विभागात ३०० मुलांच्या आणि शिक्षकांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना बांबले यांनी सर्व सूत्रे सांभाळत शिक्षकांच्या सहकार्याने प्रभात फेरीला सुरुवात केली. सपोर्ट संघटनेच्या इजाज खान यांनी व्यसनमुक्तीचे नारे देत नागरिकांना पत्रकवाटप केले. नशाबंदी मंडळाच्या मुंबई उपनगरच्या संघटक दिशा कळंबे यांनी नशेपासून दूर राहण्यासाठीचा संदेश दिला. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्याचे विवेक साळवी यांनी प्रभात फेरीचे प्रतिनिधित्व केले आणि मुलांना खाद्यपदार्थांचे वितरण केले.