धोकादायक स्कूल बस थांबा हटवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धोकादायक स्कूल बस थांबा हटवला
धोकादायक स्कूल बस थांबा हटवला

धोकादायक स्कूल बस थांबा हटवला

sakal_logo
By

भिवंडी, ता. २६ (बातमीदार) : महापालिकेने कल्याण रोड येथे वीज कर्मचारी निवासाजवळ बांधलेला बस थांबा कालबाह्य व नादुरुस्त झाल्याची बातमी ‘सकाळ’मध्ये ‘भिवंडीत बस थांब्‍याची दुरवस्था’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाली होती. याप्रकरणी पालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई करीत धोकादायक भाग काढून टाकला असल्याची माहिती प्रभाग समिती क्रमांक दोनचे अभियंता सचिन नाईक यांनी दिली.

शहरातील कल्याण रोड येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या नोडल कार्यालय आणि कर्मचारी वसाहतीजवळ बऱ्याच वर्षांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांसाठी बस थांबा बनविलेला होता. हा बस थांबा लोखंडी खांब व पत्र्याने बनविलेला असल्याने तो गंजून मोडकळीस आला. या मार्गावरून जाणारे समाजसेवक आणि पालिकेचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य होते. शहरातील विविध शाळांच्या बस या ठिकाणी थांबत असल्याने मुले या नादुरुस्त व कालबाह्य बस थांब्‍याजवळ उभे राहत होते. तर बस वाट पाहत उभे असलेले विद्यार्थी काहीवेळा बस थांब्याच्या नादुरुस्त शेडमध्ये रेंगाळताना दिसत होते. बऱ्याचवेळा पालकवर्ग त्यांच्या सोबत नसल्याने मुले बस थांब्यावर रेंगाळताना दुर्घटनेची शक्यता होती.
नवीन बस थांबा प्रस्‍तावित
नादुरुस्त बस थांबा दुरुस्त करावा अन्यथा मोडकळीस आलेला हा थांबा मुळापासून काढून टाकावा,अशी मागणी परिसरातील स्थानिक नागरिकांनी ‘सकाळ’कडे केली. सकाळमध्‍ये प्रसिद्ध झालेल्‍या बातमीची दखल घेत पालिकेच्या प्रभाग समिती दोनचे प्रभाग अधिकारी फैजल तातली यांनी अभियंता सचिन नाईक यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नाईक यांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या थांब्याचा धोकादायक भाग हटविण्‍यात आला आहे. या ठिकाणी विद्यार्थी व पालक यांना उभे राहण्यासाठी नवीन बस थांबा आमदार निधीतून बनविण्यासाठी प्रस्तावित असल्‍याची माहिती अभियंता सचिन नाईक यांनी दिली.