Tue, Jan 31, 2023

राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत राजवीचा ठसा
राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत राजवीचा ठसा
Published on : 26 December 2022, 10:47 am
दिवा, ता. २६ : महाराष्ट्र राज्यस्तरीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा मुंबईतील दादर येथे २४ ते २५ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सीनियर या विभागात घेण्यात आली. त्यात सब जुनिअरमध्ये किक बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत दिवा येथे राहणारी राजवी मिलिंद चाळके हिने रौप्यपदक पटकावले आहे. तिच्या या यशाबद्दल दिवा परिसरातून आणि शिक्षकांकडून तिचे अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी तिच्या पालकांनी तिला नेहमी प्रोत्साहन दिले. प्रशिक्षक सत्यविजय राऊत आणि अक्षय कदम यांचेही तिला मार्गदर्शन केले.