Wed, Feb 8, 2023

शिवसेनेतर्फे नाताळ गोठा स्पर्धेचे आयोजन
शिवसेनेतर्फे नाताळ गोठा स्पर्धेचे आयोजन
Published on : 26 December 2022, 12:07 pm
वसई, ता. २६ (बातमीदार) : वसई तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नाताळ गोठा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पालघर जिल्हा प्रमुख पंकज देशमुख यांनी दिली. तसेच आमदार सुनील शिंदे यांनी देखील नाताळ गोठ्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी माजी नगरसेवक राजन पाटील, उपतालुकाप्रमुख सुनील मुळे, विधानसभा समन्वयक हरिश्चंद्र पाटील, महिला शहर संघटक जेंसीटा फिंच, सल्लागार विजय मच्याडो, वसई शहरप्रमुख प्रथमेश राऊत, सुरेश रॉड्रिग्ज व नवघर माणिकपूर शहरप्रमुख संजय गुरव यांच्याकडे स्पर्धकांनी नोंदणी करावी, असे आवाहन सल्लागार सायमन मार्टिन यांनी केले आहे.