रिसॉर्टमधील तरणतलावात बुडून मुलाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिसॉर्टमधील तरणतलावात बुडून मुलाचा मृत्यू
रिसॉर्टमधील तरणतलावात बुडून मुलाचा मृत्यू

रिसॉर्टमधील तरणतलावात बुडून मुलाचा मृत्यू

sakal_logo
By

मनोर, ता. २६ (बातमीदार) : चिल्हार-बोईसर रस्त्यावरील गुंदले गावच्या परिसरातील एका रिसॉर्टमधील तरणतलावात आज (ता. २६) बुडून नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. पालकांची नजर चुकवून तरणतलावात पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांपैकी एकाला बेशुद्धावस्थेत खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आले होते, परंतु उपचारांआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नाताळ सुट्ट्या आणि नववर्ष साजरे करण्यासाठी डहाणू तालुक्यातील कासा येथील वाडकर कुटुंबीय मामाचा गाव नावाच्या रिसॉर्टमध्ये आले होते. सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पालकांची नजर चुकवून दोन मुले तरणतलावात उतरली होती. याच वेळी रिसॉर्टमधील जीवरक्षक अल्पोपाहार करण्यासाठी गेले असता तरणतलावात उतरलेला रुद्र देविदास वाडकर हा मुलगा बुडाला होता. त्याला उपचारांसाठी नागझरी नाक्यावरील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याच रिसॉर्टच्या मालकाचा तरणतलावाच्या उद्‍घाटनाच्या दिवशी मृत्यू झाला होता, असे सांगितले जात आहे.