Mon, Feb 6, 2023

पालघर अतिक्रमणावर कारवाई
पालघर अतिक्रमणावर कारवाई
Published on : 26 December 2022, 11:41 am
पालघर, ता. २६ (बातमीदार) : पालघर नगरपरिषद कार्यक्षेत्रातील गोचरण भरवाड पाडा येथे जमिनीवर एका औद्योगिक कंपनीने अतिक्रमण करून अनधिकृत शेड उभारली होती. या शेडच्या उभारणीला अनेकदा विरोध झाला असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र अनेकदा याबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी तहसीलदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार जेसीपी यंत्रांच्या मदतीने कारवाई हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.