शाहूनगर पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूनगर पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा
शाहूनगर पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा

शाहूनगर पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा

sakal_logo
By

धारावी, ता. २६ (बातमीदार) : महर्षी वाल्मीकी हरिजन सेवा समाज व भीम आर्मी दक्षिण-मध्य मुंबई विभाग आणि इतर संस्था-संघटनांच्या वतीने आज गुन्हे रद्द करण्यासोबत विविध मागण्यांसाठी शाहूनगर पोलिस ठाण्यावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सहायक आयुक्त दीपक देशमुख, माहीम डिव्हिजन आणि शाहू नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक ठुबे यांना मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष जाहीद अली शेख, वाल्मीकी हरिजन सेवा संघाचे प्रधान दीपक चावरिया, सामाजिक कार्यकर्ते संजय रमेश भालेराव, आशिष मोरे, मारयण नायगम, राजेंद्र लेडिया, राजेश टाकेकर, नूर खान, किरण निकम, जुड मुदलियार, अफसरून शेख, लता तांबे, आशा वाघमारे, सुरेखा लांडगे, सुजाता गाडे, विलास मगर, सुनील अंगारखे, साजिद जानी शेख, नफिसा अमीर पठाण, मुन्नी आप्पा यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालावे; अन्यथा पुढील आठ दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाही, तर माटुंगा लेबर कॅम्प बंद करू; त्यानंतर धारावी बंद करण्याचा इशारा संजय भालेराव यांनी दिला.