Fri, Feb 3, 2023

वासिंद ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश
वासिंद ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Published on : 26 December 2022, 12:35 pm
वासिंद, ता. २६ (बातमीदार) : वासिंद ग्रामपंचायतीचे सदस्य वासुदेव काठोळे व काळूराम पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख प्रकाश काठोळे, कॉंग्रेसचे माजी विभागीय अध्यक्ष राजेश भोईर, भास्कर काठोळे, ज्येष्ठ शिवसैनिक नितीन हजारे यांच्यासह मोठ्या संख्येने युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, अनुसूचित मोर्चा ठाणे ग्रामीण अध्यक्ष काळूराम धनगर, वासिंद शहर अध्यक्ष अनिल शेलार, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप बेलवले, रघुनाथ भोईर, पुंडलिक देसले, अजित भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.