Mon, Feb 6, 2023

शिर्डी-विशाखापट्टणम एक्स्प्रेसला एसी कोच जोडणार
शिर्डी-विशाखापट्टणम एक्स्प्रेसला एसी कोच जोडणार
Published on : 26 December 2022, 1:38 am
मुंबई, ता. २६ : मध्य रेल्वेने साईनगर शिर्डी-विशाखापट्टणम एक्स्प्रेसमला कायमस्वरूपी अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या एक्स्प्रेसचा डब्यांची संख्या १६ वरून आता १७ वर पोहचणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक १८५०४/१८६०३ साईनगर शिर्डी-विशाखापट्टणम एक्स्प्रेसमध्ये एक अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला साईनगर शिर्डी येथून ३० डिसेंबर २०२२ आणि विशाखापट्टणम येथून २९ डिसेंबर २०२२ पासून हा कोच लावण्यात येणार आहे. आता साईनगर शिर्डी-विशाखापट्टणम एक्स्प्रेसमध्ये एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये एक गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन अशी सुधारित संरचना असणार आहे.