वॉटर टॅक्सी सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वॉटर टॅक्सी सुसाट
वॉटर टॅक्सी सुसाट

वॉटर टॅक्सी सुसाट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : बेलापूर ते मांडवादरम्यान अत्याधुनिक वॉटर टॅक्सी नाताळनिमित्त सुरू झाली आहे. पहिल्या दोन दिवसांत वॉटर टॅक्सीला पर्यटकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. शनिवार-रविवारी बेलापूर ते मांडवा वॉटर टॅक्सीतून ५०० पेक्षा जास्त पर्यटकांनी समुद्र सफारीचा आनंद लुटला.
नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची २०० प्रवाशांची क्षमता असलेली अत्याधुनिक हायस्पीड वॉटर टॅक्सी १ नोव्हेंबरपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली होती. डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते मांडवा यादरम्यान ही वातानुकूलित हायस्पीड वॉटर टॅक्सी सध्या धावत आहे. आता कंपनीने नाताळ आणि नववर्षानिमित्त बेलापूर ते मांडवादरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली आहे. शनिवार-रविवारी पहिल्या दोन दिवस नाताळ असल्याने वॉटर टॅक्सीला तुफान प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी-रविवारी ५०० पेक्षा जास्त पर्यटकांनी वॉटर टॅक्सीतून समुद्र सफारीचा आनंद लुटला असल्याची माहिती नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आणि ‘नयन इलेव्हन’चे मालक कॅप्टन रोहित सिन्हा यांनी दिली आहे.
...
वीकेंडला सेवा
वॉटर टॅक्सी बेलापूरहून सकाळी ८ वाजता सुटेल आणि ९.१५ वाजता मांडवा येथे पोहोचेल. मांडवा येथून ही सेवा संध्याकाळी ६ वाजता असेल आणि बेलापूर येथे ७.४५ वाजता पोहोचेल. ही वॉटर टॅक्सी सेवा फक्त शनिवार ते रविवार धावणार आहे. एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी तिकीट दर ३०० रुपये आणि बिझनेस क्लाससाठी ४०० रुपये तिकीट दर आहे.