आरटीओ कार्यालयात स्मार्ट कार्डचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीओ कार्यालयात स्मार्ट कार्डचा तुटवडा
आरटीओ कार्यालयात स्मार्ट कार्डचा तुटवडा

आरटीओ कार्यालयात स्मार्ट कार्डचा तुटवडा

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : परिवहन विभागात सध्या लायसन्सच्या स्मार्ट कार्डचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईसह राज्यभरात ही समस्या असून ट्रान्सपोर्ट आणि टुरिस्ट टॅक्सी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना पर्मनंट लायसन्स टेस्टसाठी वेळच दिली जात नाही; तर काही प्रमाणात खासगी लायसन्स मिळवण्यासाठीसुद्धा अडचणींचा सामना करावा लागतो आहे. परिवहन विभागाने दोन कंपन्यांना स्मार्ट कार्ड पुरवण्याचे कंत्राट दिले आहे. त्यापैकी एका कंपनीकडून स्मार्ट कार्डचा अपुरा पुरवठा होत असल्याने राज्यभरात ही समस्या निर्माण झाल्याचे परिवहन विभागाने सांगितले.
मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथे राहणारे संदीप बाबूराव कोकीटकर यांनी मुंबई सेंट्रल येथील आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण करण्यासाठी अर्ज केला; मात्र स्मार्ट कार्डच्या तुटवड्यामुळे त्यांना ड्रायव्हिंग टेस्टची वेळसुद्धा दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या एक महिन्यापासून कोकिटकर ड्रायव्हिंग टेस्टसाठी नोंदणी करत आहेत; मात्र अजूनही त्यांची टेस्ट झाली नाही. ट्रान्सपोर्ट आणि टुरिस्ट टॅक्सीचालकांना याचा सर्वाधिक फटका बसतो आहे.
...
कंपनीला सूचना
लायसन्सचे स्मार्ट कार्ड पुरवण्यासाठी एका कंपनीला २४; तर दुसऱ्या कंपनीला २६ आरटीओ कार्यालयांतील काम देण्यात आले आहे. त्यापैकी एका कंपनीकडून पुरवठा कमी केला जात असल्याने काही दिवसांपासून काहीच ठिकाणी स्मार्ट कार्डची समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात कंपनीला सूचना केल्या असल्याचे परिवहन विभागाचे उपायुक्त संदेश चव्हाण यांनी सांगितले आहे.
...
आरटीओ कार्यालयात लायसन्सची प्रिंट उशिरा होत असल्यामुळे ट्रान्सपोर्ट आणि हेवी ट्रान्सपोर्ट लायसन्सच्या पर्मनंट लायसन्सची तारीख मिळत नाही. त्यामुळे लायसन्सधारकांना पुन्हा लर्निंग लायसन्स काढण्याची वेळ आली आहे.
- विकास पवार, चिटणीस, मनसे वाहतूक सेना