Tue, Jan 31, 2023

अत्याचारप्रकरणी आरोपी अटकेत
अत्याचारप्रकरणी आरोपी अटकेत
Published on : 26 December 2022, 6:00 am
मुंबई, ता. २६ : तृतीय पंथी व्यक्तीशी अनैसर्गिक लैंगिक संबंध तसेच धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी एका तृतीय पंथी व्यक्तीशी बळजबरीने अनैसर्गिक लैंगिक संबंध बनवत असताना एका दुसऱ्या तृतीय पंथीने आरोपीला रोखले. परंतु आरोपीने त्या तृतीय पंथी व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत गोवंडी परिसरातून आरोपीला अटक केली. शनिवारी पीडित तृतीय पंथी व्यक्ती घरी जात असताना आरोपीने अडवून हा प्रकार केला होता. आरोपी हल्ला केल्यावर घटनास्थळावरून पळून गेला होता.