हॅप्पी स्ट्रीट सोहळ्याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॅप्पी स्ट्रीट सोहळ्याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद
हॅप्पी स्ट्रीट सोहळ्याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

हॅप्पी स्ट्रीट सोहळ्याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया आणि कुळगाव पूर्व पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २५ डिसेंबर रोजी पनवेल हायवे, बदलापूर पूर्व येथे ‘हॅपी स्ट्रीट’ हा एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नृत्य, योग, संगीत, सायकलिंग, धावणे, स्केटिंग यासारख्या शारीरिक क्रियांचा विकास आणि प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.

‘हॅपी स्ट्रीट’ कार्यक्रमात रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर कोलवेकर, कुळगाव पूर्व पोलिस ठाण्‍याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल पडवळ हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. सध्या सेलफोनच्या आणि इतर माध्यमांच्या ध्यासातून सुटका होणे, शरीर, मन, आत्म्याचे संतुलन आणि समन्वय होणे, यासाठी आजच्या तरुणांना आरोग्यदायी सवयी वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांची आणि प्रेरणांची गरज आहे. लोकांचे एकत्रित येणे आणि अशा कार्यक्रमात सहभागी होणे ही आजची गरज आहे आणि त्यात आजचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे, असे प्रतिपादन या वेळी कोलवेकर यांनी केले. समाजोपयोगी कार्यक्रमांना पोलिसांकडून निश्चित सहकार्य मिळेल, असे अनिल पडवळ यांनी सांगितले.