निकृष्ठ दर्जामुळे रस्त्यातील सळ्या बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निकृष्ठ दर्जामुळे रस्त्यातील सळ्या बाहेर
निकृष्ठ दर्जामुळे रस्त्यातील सळ्या बाहेर

निकृष्ठ दर्जामुळे रस्त्यातील सळ्या बाहेर

sakal_logo
By

वाडा, ता. २७ (बातमीदार) : वाडा नगरपंचायतीकडून गेल्या काही महिन्यांत सिमेंट क्राँकीटीकरणाचे रस्ते तयार करण्यात आले आहेत; मात्र हे रस्ते निकृष्ट दर्जाचे बनवल्याचे समोर येत आहे. शिवाजी नगर येथील रस्त्यावर चक्क रस्त्यातील लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. या सळ्या पादचाऱ्यांच्या पायाला लागून जखमी होणे; तर वाहनांच्या टायरला लागून अपघात होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
वाडा नगरपंचायतीच्या वतीने विविध योजनांतून लाखो रुपये खर्च करून सिमेंट क्राँकीटीकरणाचे रस्ते काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले आहेत. शिवाजी नगरकडे जाणारा रस्ताही तयार करण्यात आला असून या रस्त्यातील लोखंडी सळ्या आता रस्त्याबाहेर आल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदार व त्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

--------------------------
शिवाजीनगर रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- उद्धव कदम, प्रभारी मुख्याधिकारी, वाडा नगरपंचायत