पादचारी जोडपूल बांधण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पादचारी जोडपूल बांधण्याची मागणी
पादचारी जोडपूल बांधण्याची मागणी

पादचारी जोडपूल बांधण्याची मागणी

sakal_logo
By

मुलुंड, ता. २७ (बातमीदार) ः मुंबई महापालिकेने नवीन वर्षात भांडुपकरांसाठी तीन पादचारी पूल बांधण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्‍ये भांडुप पूर्वेतील वीर सावरकर नगर मेनन कॉलेज येथील पादचारी पुलाचा समावेश आहे. हा पूल उषानगर कॉम्प्लेक्सला जाऊन मिळणार आहे; मात्र या पादचारी पुलाला जोडून आणखीन एक पूल भांडुप स्थानकापर्यंत बांधण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या माजी नगरसेविका अनिषा माजगावकर यांनी केली आहे.
जोडपूल बांधण्यात आल्‍यास त्याचा फायदा उषा नगर कॉम्प्लेक्समधील रहिवासी, शास्त्री नगर आणि कुकरेजा कॉम्प्लेक्स येथील नागरिकांना होईल असे स्‍थानिकांचे मत आहे. सद्यपरिस्थितीत येथील रहिवासी भांडुप पश्चिम रेल्वे स्थानक गाठायला रेल्वे ट्रॅकला समांतर असणाऱ्या पायवाटेचा वापर करतात. ही पायवाट धोक्याची असून येथून मार्गक्रमण करताना अनेक अपघात घडले आहेत, तसेच या रस्त्यावरून जाताना अनेक लूटमारीचे प्रकारदेखील घडले आहेत. याबाबतच्या असंख्य तक्रारी येथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते विवेक सावंत यांच्याकडे केल्या आहेत. त्‍यामुळे या भागात बांधण्यात येत असलेल्‍या पुलाला जोडपूल उभारला जावा, अशी मागणी केली जात आहे.

येथे उभारणार तीन पूल
भांडुप पूर्वेतील चामुंडा नगर
हेमा पार्क येथील मेनन कॉलेज
भांडुप पश्चिम येथील उषानगर

उषानगर येथून भांडुप स्टेशनला जोडणारा एक नवीन जोडपूल उभारला गेला, तर त्याचा फायदा या परिसरातील लोकांना होईल. हा जोडपूल उभारण्यासाठी अथवा याच जागी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने पक्का रस्ता बनवावा यासाठी रेल्वे प्रशासन आणि महापालिका यांना निवेदन देणार आहे.
- अनिषा माजगावकर, माजी नगरसेविका