पुस्तक परीक्षण कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुस्तक परीक्षण कार्यशाळा
पुस्तक परीक्षण कार्यशाळा

पुस्तक परीक्षण कार्यशाळा

sakal_logo
By

मुलुंड, ता. २७ (बातमीदार) ः मुंबई विद्यापीठातील सर्वच महाविद्यालयांतील तृतीय वर्ष कला शाखेतील मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक परीक्षण करण्यासाठी विविध पुस्तके दिली जातात. याचा समावेश परीक्षेत करण्यात आलेला आहे. पुढील काळातील समीक्षक आणि समीक्षणातील लेखनाचे महत्त्‍व ओळखून सुप्रसिद्ध संशोधिका, समीक्षिका प्रा. प्रज्ञा मनिष पंडित यांच्यातर्फे विनामूल्य ‘पुस्तक परीक्षण’ कार्यशाळेचे आयोजन रविवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. प्रा. प्रज्ञा पंडित या स्वतः लेखिका, कवयित्री, निवेदिका आणि समिक्षिका असून आतापर्यंत त्यांची बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्‍या ऑनलाईन माध्यमातून विनामूल्य शिबीर घेणार असून अधिक माहितीसाठी learnwithpradnyapandit@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.