भाजपविरोधात काँग्रेसची मोर्चेबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपविरोधात काँग्रेसची मोर्चेबांधणी
भाजपविरोधात काँग्रेसची मोर्चेबांधणी

भाजपविरोधात काँग्रेसची मोर्चेबांधणी

sakal_logo
By

कामोठे, ता. २७ (बातमीदार) : पनवेल महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपची सत्ता उलथवण्यासाठी महाविकास आघाडीने मोट बांधली आहे. आघाडीतील घटक पक्ष असलेला काँग्रेस राजकीय यशापासून वंचित आहे, पण अशा परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली असून आगामी पनवेल महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय रणनीती, ध्येयधोरणे निश्चित करण्यात आली आहेत.
पनवेलमधील काँग्रसे भवन कार्यालयात पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकीसह इतर राजकीय विषयांवर चर्चा केली. जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेबाबत अभिनंदनाचा ठराव घेतला. या वेळी तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी, पनवेल अर्बन बँकेचे संचालक अरविंद सावळेकर, जनार्दन पाटील, विमल गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा निर्मला म्हात्रे, शहराध्यक्ष लतीफ शेख, जिल्हा सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नोफील सय्यद, युवक जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, जेष्ठ नेत्या अंजलीदेवी पालकर, प्रताप गावंड, माया अहिरे, प्रेमा अपाचा, आबा खेर, राकेश जाधव, प्रीतेश शाहू उपस्थित होते.
----------------------------------
‘हात से हात जोडो’ अभियान
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिलेल्या सूचनेनुसार ‘हात से हात जोडो’ अभियान पनवेलमध्ये राबवण्यात येणार आहे. याच अनुषंगाने २६ जानेवारी ते २२ मार्च या काळात पनवेल महापालिका क्षेत्रासह तालुक्यात अभियान राबवले जाणार आहे. यासाठी बैठकीत नियोजन समितीची स्थापना करण्यात आली असून शहरात बाईक व काररॅलीसह पदयात्रा काढण्यात येणार आहे.