भारती विद्यापीठमध्ये वार्षिक क्रीडा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारती विद्यापीठमध्ये वार्षिक क्रीडा उत्साहात
भारती विद्यापीठमध्ये वार्षिक क्रीडा उत्साहात

भारती विद्यापीठमध्ये वार्षिक क्रीडा उत्साहात

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २७ (बातमीदार) : भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विक्रमगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा क्रीडा सोहळा सुरू करण्यात आला. या वेळी शाळेतील मुख्याध्यापक त्यागराजन चट्टीयार व वसतिगृह विभागाचे अध्यक्ष महेश कुऱ्हाडे, शिक्षक तसेच कर्मचारी उपस्थित होते. सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शाळेतील क्रीडा शिक्षक वसंत चोपदार, अविनाश भूसारा, तसेच सहायक शिक्षक योगेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राजक्ता चौधरी, दिलीप चौधरी, दिलीप टोकरे, मृणाली जाधव, योगिनी देवरे, अर्चना घोलप, नेताजी घोलप, मोनाली म्हात्रे, विलास चौधरी, मेघा ठाकरे, प्रियंका थोरात या सर्वांनी सहकार्य केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, शिक्षक संघातील सदस्य, कर्मचारी यांनी अभिनंदन केले.