दिव्यात लेफ्टनंट स्वराज बनेंचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यात लेफ्टनंट स्वराज बनेंचा सत्कार
दिव्यात लेफ्टनंट स्वराज बनेंचा सत्कार

दिव्यात लेफ्टनंट स्वराज बनेंचा सत्कार

sakal_logo
By

दिवा, ता. २७ (बातमीदार) : भारतीय सैन्य दलात भरती होऊन लेफ्टनंटपदी निवड झालेल्या लेफ्टनंट स्वराज बने यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाचे आयोजन ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृह येथे शौर्य डिफेन्स अकॅडमी आणि महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार संजय केळकर, मेजर प्रांजळ जाधव यांच्या हस्ते लेफ्टनंट स्वराज बने यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मेजर सुभाष गावंड, महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, शौर्य डिफेन्स अकॅडमीचे संस्थापिका वैशाली म्हेत्रे, सुहास भोळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मेजर प्रांजल जाधव, लेफ्टनंट स्वराज बने, महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, शौर्य डिफेन्स अकॅडमी संस्थापिका वैशाली म्हेत्रे, सुहास भोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी आमदार संजय केळकर, मेजर प्रांजळ जाधव यांच्या हस्ते लेफ्टनंट स्वराज बने यांचा सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे सल्लागार सदाशिव गारगोटे, कार्याध्यक्ष सुवर्णा भोईर, उपाध्यक्ष प्रज्ञा जाधव, संपर्कप्रमुख नम्रता पाटील, प्रदीप भोईर, प्रिया जगदाळे तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुचिरा जोशी, डॉ. मयूरेश जोशी यांनी केले. सुहास गोळे यांनी आभार मानले.

--------------
खडतर प्रवासातून यश
लेफ्टनंट स्वराज बने यांनी खूप खडतर जीवन प्रवासामधून अभ्यास करत कठीण परिश्रमातून हे यश संपादन केले आहे. आपल्या सैन्य दलातील भरती होण्याच्या जिद्दीने लेफ्टनंट पदावर त्याची निवड झाल्याने शौर्य डिफेन्स अकॅडमीच्या संस्थापिका वैशाली म्हत्रे यांनी त्यांचे कौतुक केले. सैन्य दलात भरती झाल्यानंतर आपल्या रेजिमेंटसोबत कसे राहायचे तसेच पुढील कार्यकाळात अभ्यास करून मोठ्या पदापर्यंत कशी मजल मारायची याबद्दल मेजर सुभाष गावंड यांनी मार्गदर्शन केले.