गोखीवरेचे संत रॉक चर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोखीवरेचे संत रॉक चर्च
गोखीवरेचे संत रॉक चर्च

गोखीवरेचे संत रॉक चर्च

sakal_logo
By

गाथा ख्रिस्त मंदिराची
संदीप पंडित
--------
वसई तालुक्यात पोर्तुगीजांनी अनेक चर्चची उभारणी केली. या चर्चना ऐतिहासिक महत्त्व आहे. पण पुरातन चर्चनंतर एकोणिसाव्या शतकात वसईमध्ये अनेक चर्च निर्माण झाले. त्यातील एक चर्च म्हणजे गोखीवरे येथील संत रॉक चर्च होय.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी प्लेगची साथ आली होती. कोकण किनारपट्टीही यातून सुटली नव्हती. त्यावेळी गोखीवरे गावातील लोकांनी वैद्य ‘संत रॉक सायबा’ यांचा धावा केला. त्यानंतर प्लेगची साथ कमी झाली. काही काळानंतर संत रॉक नावाने गोखीवरे गावात कारवीच्या कुडाचे चर्च आकाराला आले. त्यानंतर १९३० साली आर्च बिशप यांच्या पुढाकाराने कौलारू चर्च उभे राहिले. त्याआधी कॅथॉलिक समाजाचे सर्व विधी हे माणिकपूर चर्च येथून होत असत. गोखीवरे चर्चला १९४३ साली धर्मग्रामाचा दर्जा मिळाला. गोखीवरे धर्मग्रामचे पहिले धर्मगुरू म्हणून फादर न्यूबीओला यांची नेमणूक करण्यात आली होती. सध्या चर्चची जी भव्य वास्तू उभी आहे ती उभारणीसाठी फादर ज्यो घोन्सालवीस यांच्या पुढाकाराने हिंदू धर्मीयांनीही सढळ हस्ते मदत केली. हिंदू धर्मात ईशान्य दिशेला जसे महत्त्व आहे तसेच ख्रिस्ती धर्मामध्येही आहे. त्यामुळे या चर्चचे प्रवेशद्वार ईशान्य दिशेला आहे. चर्चची वेदी ही नवीन बनविण्यात आली आहे. यात २० तोळे सोने ओतून वेदीची सजावट करण्यात आली आहे. तर या चर्चच्या नव्या वस्तूचा उद्‌घाटन सोहळा बिशप थॉमस डाबरे यांच्या हस्ते पार पडला होता.
...
ख्रिस्ती धर्मामध्ये तीन सणांना मोठे महत्त्व आहे. पहिला सण म्हणजे ईस्टर, दुसरा प्रीस्ट ऑफ द हॉली स्पिरिट आणि तिसरा सण ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजेच नाताळ. नाताळ हा सण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो. कारण देवाने मानवी देह धारण केला. तो मानवाचे तारण करण्यासाठी प्रेमाचा, शांतीचा संदेश देण्यासाठी या जगात आला. म्हणून सर्वत्र आनंदी आनंद आहे. बाळ येशूची शांती आपल्या कुटुंबात समाजात प्रस्थापित व्हावी ही प्रभू चरणी प्रार्थना.
- फादर ग्रेग परेरा, प्रमुख धर्मगुरू