रुग्णालयातील स्थितीचा आढावा, जेजे , सेंट जॉर्ज आणि पालिकेच्या इतर रुग्णालयात माॅक ड्रिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालयातील स्थितीचा आढावा, जेजे , सेंट जॉर्ज आणि पालिकेच्या इतर रुग्णालयात माॅक ड्रिल
रुग्णालयातील स्थितीचा आढावा, जेजे , सेंट जॉर्ज आणि पालिकेच्या इतर रुग्णालयात माॅक ड्रिल

रुग्णालयातील स्थितीचा आढावा, जेजे , सेंट जॉर्ज आणि पालिकेच्या इतर रुग्णालयात माॅक ड्रिल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : कोविडविरोधात लढण्यासाठी पालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये मंगळवारी माॅकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी केलेल्या सर्व सुविधांचा यावेळेस आढावा घेतला गेला. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार राज्य सरकारच्या जेजे, सेंट जॉर्ज, जीटी आणि कामा रुग्णालयात तसेच पालिकेच्या काही रुग्णालयांत हे माॅकड्रिल घेण्यात आले.
आज देशातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनासाठी प्रशासकीय पातळीवर किती तयारी आहे? यासाठी महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा पातळीवर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी रुग्णालयांची सज्जता, ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर-पॅरामेडिकल स्टाफ, नर्स यांची उपलब्धता आणि संख्या या सर्वांवर भर दिला जात आहे.

जेजे रुग्णालय
फिवर ओपीडी, आपातकालीन विभागाची सोय आहे. येथे १३५२ बेड्स असून प्रत्येक बेड ऑक्सिजनने सज्ज आहे. तसेच लिक्विड ऑक्सिजनची सोय आहे. गर्भवती महिलांसाठी ट्रान्झिट वाॅर्डची सुविधाही येथे आहे. आरटीपीसीआर चाचणी, प्रयोगशाळा सज्‍ज असून १०० बेडचे आयसीयू वाॅर्ड व ३० बेडचे पीआयसीयू आणि एनआयसीयू वॉर्डही सज्‍ज आहेत, अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. अशोक आनंद यांनी दिली

सेंट जॉर्ज रुग्णालय
सेंट जॉर्ज रुग्णालयातील पाच नंबर वाॅर्ड समर्पित कोविड वॉर्ड करण्यात आला आहे. या वाॅर्डमध्ये १५ बेड्स आयसीयू आणि ३५ बेड्स सामान्य ठेवण्यात आले आहेत. ४६६ बेड्स ऑक्सिजन युक्त आहेत. त्यात व्हेंटिलेटर, पीयसीयू, डायलिसीसची सुविधा आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.

सेव्हन हिल्स रुग्णालय
पालिकेचे समर्पित कोविड रुग्णालय सक्रिय झाले आहे. मॉकड्रिलमध्ये व्यवस्थापन, ऑक्सिजनची क्षमता, लिकेज इश्यू, ऑक्सिजन वापरण्याचे महत्त्व, आपातकालीन परिस्थितीत ऑक्सिजन कसे तपासायचे याचे प्रशिक्षण दिले गेले. ॲडमिशन, प्रोटोकॉल आणि आयसीयू किंवा वॉर्ड रुग्ण त्यांची चौकशी, तपासणी, प्रवासाचा इतिहास, कोविड पूर्व इतिहास, लसीकरणाचा इतिहास, डायबिटीस वॉर रुमनुसार कोणत्या वॉर्डात दाखल करायचे याविषयीचे प्रशिक्षण त्यांना दिले गेले. मल्टि पॅरामॉनिटर, बायमॅप, व्हेटिंलेटर याचे डॉक्टरांना प्रशिक्षण दिले गेले. शिवाय, काही मॉब रुग्णांसोबत हे मॉकड्रिल केले गेले, अशी माहिती सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र कुंभार यांनी दिली.

सेव्हन हिल्समधील बेडची सुविधा
१८५० बेड्स
३२८ आयसीयू व व्हेटिंलेटर युक्त बेड्स
६५० ऑक्सिजनयुक्त बेड्स
८०० सामान्य बेड्स
२० गरोदर महिलांसाठी बेड्स
५० डायलिसिस बेड्स

माॅक ड्रिल कशासाठी -
जेव्हा कोविड काळ सुरू झाला तेव्हा उपचार काय करायचे? कसे करायचे ? याची माहिती कोणालाही नव्हती. पण, आता याचा अनुभव प्रत्येक रुग्णालयाला आला असून यापुढे रुग्णांसाठीची उपचार पद्धती ठरवली गेली आहे. याचा मोठा अनुभव डाॅक्टरांना आला आहे. पहिल्यांदा रुग्ण रुग्ण वाहिकेतून आला की त्याला ओपीडीला तपासले जाईल. त्यानंतर, स्वॅब घेतला जाईल. जर रुग्ण गंभीर असेल तर त्याला एका ट्रान्झिट वाॅर्ड मध्ये ठेवले जाईल त्यानंतर त्याला सेंट जॉर्ज किंवा परिस्थितीनुसार इतर रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी पाठवले जाईल. या सर्वांचे प्रशिक्षण माॅकड्रिलच्या साहाय्याने कर्मचारी आणि डाॅक्टरांना दिले गेले.