Sun, Feb 5, 2023

जीर्णावस्थेतील विजेचा खांब बदला
जीर्णावस्थेतील विजेचा खांब बदला
Published on : 27 December 2022, 12:10 pm
वसई, ता. २७ (बातमीदार) : नालासोपारा पश्चिमेकडील उमराळे वंळबाव येथील रॉयल पेगाडो यांच्या घरासमोरील विजेचा खांब जीर्ण झाला असून याबाबत महावितरण अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी तक्रार केली आहे. परंतु अद्याप कोणतीच उपाययोजना करण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या मार्गावरून विद्यार्थी, ग्रामस्थ ये जा करत असतात. खांब जीर्णावस्थेत असल्याने दुर्घटना घडू शकते त्यामुळे नवीन खांब टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणी विजय मच्याडो यांनी केली आहे.