
विज्ञानासोबत आध्यत्मकतेची सांगड
वसई, ता. २७ (बातमीदार) : अभ्यासासोबत पर्यावरण, निसर्ग, विज्ञान व भाषा, अध्यात्माचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम दर्शविण्यासाठी प्रात्यक्षिकांचा माध्यमातून शाळकरी आणि महाविद्यालयाच्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी अनोखी सांगड घालत मॉडेल तयार करून शिक्षक, पालक आणि परीक्षकांचे मन मोहून टाकले. हा उपक्रम वसईच्या सेंट अॅन्स स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने हाती घेतला होता.
मराठी भाषेचा उगम व विकास, आरोग्य, स्वच्छता, जलप्रदूषण, पाणी संवर्धन, आहाराचे महत्त्व यासोबत रस्ते सुरक्षा, स्वच्छ भारत अभियान, हुंडा बळी, एकत्र कुटुंब पद्धत आणि त्याचा फायदे, फळ, पालेभाज्यांचे महत्त्व, झाडे जगवा पर्यावरण वाचवा, ऐतिहासिक किल्ले संवर्धन, पारायण, संत ज्ञानेश्वरी, विठ्ठल रखुमाई, देवीची रूपे यासह अध्यात्म मार्ग आदींची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाद्वारे सादर केली. त्याचे भेट देणारे पालक, परीक्षकांनी कौतुक केले. यावेळी माजी नगराध्यक्षा राजेश्वरी नारायण, सिस्टर प्लासील्डा, सिस्टर वेक्सलिन, सभापती वृन्देश पाटील, माजी नगरसेवक छोटू आनंद यांच्यासह पालक व नागरिकांनी भेट प्रदर्शनाचे कौतुक केले.
-------------
मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आपल्या अवतीभवती असणाऱ्या परिसराची माहिती विज्ञानासोबत, भाषेचे महत्त्व व अन्य माहिती समजावी म्हणून हा उपक्रम शाळेने हाती घेतला. यात मराठी, इंग्रजी व हिंदी माध्यमातील मुलामुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
- माया तळेकर, शिक्षिका
-------------
वसई : विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडेल.