केडीएमसीतील बेकायदा जाहिरात बॅनरवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडीएमसीतील बेकायदा जाहिरात बॅनरवर कारवाई
केडीएमसीतील बेकायदा जाहिरात बॅनरवर कारवाई

केडीएमसीतील बेकायदा जाहिरात बॅनरवर कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : शहरात मोक्याच्या जागा, चौक आदी ठिकाणी बेकायदा जाहिरात करणाऱ्या विविध बॅनरवर कारवाई करण्याचा धडाका पालिका प्रशासनाने लावला आहे. सोमवारी पालिका हद्दीत एकाच दिवशी ६४३ बॅनरवर पालिकेने कारवाई केली आहे. बेकायदा बॅनर लावण्यास सक्त मनाई असतानाही पालिका हद्दीत सर्रास जाहिरात करणारे फलक लावले जात आहेत. कायदेशीर कारवाईचा बडगा उगारूनही त्याचा धाक कोणाला राहिलेला दिसत नाही. पालिकेने बेकायदा बॅनरविरोधात धडक मोहीम हाती घेतली असली तरी त्यात सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

शहरातील खासगी सामाजिक संस्था, व्यावसायिक, राजकीय मंडळी विविध कार्यक्रम असो किंवा इतर उपक्रम, आंदोलने, कोणा राजकीय नेत्यांचे आगमन असो किंवा उद्‌घाटन सोहळे त्याची जाहिरात करण्यासाठी शहरातील मोक्याच्या जागी, चौकात बॅनर लावले जातात. अनेक दिवस हे बॅनर असेच पडून असतात. यामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा येते. शहर विद्रुपीकरण करणात भर घालणाऱ्या बॅनर्स व पोस्टर्सवरील कारवाई तीव्र करण्याचे निर्देश पालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत.
त्यानुसार पालिकेच्या विविध प्रभागात सुमारे ६४३ लहान-मोठ्या बॅनरवर सोमवारी कारवाई करण्यात आली.