‘मन की बात’मध्ये आदिवासी महिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मन की बात’मध्ये आदिवासी महिलांचा सन्मान
‘मन की बात’मध्ये आदिवासी महिलांचा सन्मान

‘मन की बात’मध्ये आदिवासी महिलांचा सन्मान

sakal_logo
By

विरार, ता. २७ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील बांबू कारागीर लोकांकडून बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंची माहिती दिली. बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या बॉक्स, खुर्ची, चहादाणी, टोकरी आणि ट्रेसह विविध गोष्टींची प्रशंसा केली. तसेच त्यांनी बनवलेल्या वस्तू आज खूप लोकप्रिय झाल्या आहेत. यामुळे आदिवासी महिलांना रोजगारासह मानसन्मान मिळत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमानंतर आपल्या ट्विटरवरून सेवा विवेक सामाजिक संस्थेचे पालघर जिल्ह्यातील सामुदायिक उपक्रमांसाठी विशेष कौतुक केले. सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लागावा व त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने सेवा विवेकने पुढाकार घेतला आहे. अशा महिलांना मोफत बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण दिले जाते.