Mon, Feb 6, 2023

भिवंडी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी मुशीर नाचन
भिवंडी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी मुशीर नाचन
Published on : 27 December 2022, 12:23 pm
भिवंडी, ता. २७ (बातमीदार) : भिवंडी पंचायत समितीच्या उपसभापतिपदी मुशीर नाचन यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत समितीचे उपसभापती श्याम गायके यांनी आपसात ठरल्याप्रमाणे उपसभापती पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांच्या रिक्त असलेल्या जागी उपसभापतिपदाची निवडणूक घेण्यात आली. या वेळी मुशीर नाचन यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर तहसीलदार किशोर मराठे यांनी त्यांची उपसभापतिपदी निवड जाहीर केली. मुशीर नाचण यांची सभापतिपदी नियुक्ती होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत व ढोल-ताशाच्या गजरात पंचायती समिती परिसरात जल्लोष करत आनंद साजरा केला.