सिडकोकडून मोकळ्या जागेत मातीचा भराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडकोकडून मोकळ्या जागेत मातीचा भराव
सिडकोकडून मोकळ्या जागेत मातीचा भराव

सिडकोकडून मोकळ्या जागेत मातीचा भराव

sakal_logo
By

खारघर, ता.२७ (बातमीदार) : खारघर सेक्टर ३६ स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तलावालगत सिडकोकडून तलावात मातीचा भराव टाकण्यात येत आहे. त्यामुळे तलाव नष्ट करणार की काय अशी भीती पर्यावरणप्रेमीमध्ये पसरली आहे.

खारघरमध्ये सिडकोकडून काही दिवसांपूर्वी इनामपुरी गावाच्या मागील बाजुस आणि सेक्टर ३८ सत्य साई बाबा संजीवनी रुग्णालयाशेजारील मोकळ्या जागेत मातीचा भराव करून जमीन सपाटीकरण करण्यात आले आहे. तर मागील वर्षी तळोजा मध्यवर्ती कारागृहालगत असलेल्या पानथळ जागेत झाडे तोडून मातीचा भराव टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या वेळी पर्यावरणप्रेमीने विरोध केल्यामुळे काम थांबवण्यात आले. दरम्यान दोन दिवसांपासून स्वप्नपूर्ती समोरील तलावालगत असलेल्या मोकळ्या जागेत भराव करताना तलावात देखील मातीचा भराव करून सदर जमीनीचे सपाटीकरण करणार अशी चर्चा पर्यावरणप्रेमीमध्ये पसरली आहे. याविषयी सिडकोच्या खारघर कार्यालयात विचारणा केली असता, तलाव आणि पानथळ जागेत मातीचा भराव केला जात नाही. मोकळ्या जागेत भराव केला जात असल्याचे सांगितले. कोणत्याही पानथळ जागेत भराव करू नये असे वेटलँड समिती धोरण आहे. सिडकोने पानथळ जागेत भराव केल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा पर्यावरणप्रेमी ज्योती नाडकर्णी यांनी दिला आहे.