तुनिषा शर्मावर भाईंदरमध्ये अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुनिषा शर्मावर भाईंदरमध्ये अंत्यसंस्कार
तुनिषा शर्मावर भाईंदरमध्ये अंत्यसंस्कार

तुनिषा शर्मावर भाईंदरमध्ये अंत्यसंस्कार

sakal_logo
By

भाईंदर, ता.२७ (बातमीदार) : दूरचित्रवाणी मालिकेतील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्यावर भाईंदर पूर्व येथील गोडदेव स्मशानभूमीत मंगळवारी (ता.२७) अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी तुनिषाच्या कुटुंबियांसह तिचे सहकलाकार तसेच या प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता सिजान खान यांची आई आणि बहीणदेखील उपस्थित होते. प्रेमसंबंधात वैफल्य आल्याने तुनिषाने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे.

तुनिषा हिचा मृतदेह सोमवारी (ता.२६) रात्री उशिरा भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला होता. मंगळवारी तिचे पार्थिव भाईंदर पूर्व येथील न्यू गोल्डन नेस्ट परिसरात असलेल्या सोनम इंद्रप्रस्थ इमारतीतील तिच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी तिचे सहकलाकार कंवर ढिल्लो, विशाल जेठवा, केशभुषाकार श्याम भाटीया, दिग्दर्शक अब्बास अलीभाई आदींनी श्रद्धांजली वाहिली. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तुनिषाच्या पार्थिवावर भाईंदर पूर्व येथील गोडदेव स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी तुनिषा हीची आई वनिता शर्मा यांच्यासह अन्य नातेवाईकांना भावना अनावर झाल्या. तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेला अभिनेता सिजान खान याची आई व बहीण देखील स्मशानभुमीत उपस्थित होत्या.