देशमुखांचे अधिवेशनास जाणे न्यायालयाधीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशमुखांचे अधिवेशनास जाणे न्यायालयाधीन
देशमुखांचे अधिवेशनास जाणे न्यायालयाधीन

देशमुखांचे अधिवेशनास जाणे न्यायालयाधीन

sakal_logo
By

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता.२७ ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाले असल्याने ते हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात जाणार का, असा प्रश्न विचारला जातो आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जामीनप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उद्या (ता. २८) संध्याकाळपर्यंतचा वेळ जाईल. त्यानंतर रात्री नागपुरात जाणेही शक्य होणार नाही. कारण मुंबई सोडता येणार नाही, असे जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे.
नागपूर जिल्ह्याचे राजकारण एकेकाळी सांभाळणाऱ्या अनिल देशमुख यांना तेथे होणाऱ्या अधिवेशनात सहभागी होण्याची इच्छा आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या नेत्याला अकारण गोवले गेले होते अशी भूमिका घेतली आहे. चांदिवाल आयोग किंवा मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांच्या साक्षीत अनिल देशमुख यांना दोषी ठरवणारे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे देशमुख निर्दोष आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न होईल. त्यासाठी २९ डिसेंबरला देशमुख उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता आहे. अधिवेशनाला हजर राहाण्याची परवानगी द्या, अशी विनंती न्यायालयाला करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. मात्र २९ तारखेला अशी परवानगी न्यायालयाने दिलीच तरीही या अधिवेशनाला हजर राहाणे शक्य होणार आहे.
...
राष्ट्रवादी आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसने अनिल देशमुख यांना अकारण लक्ष्य केले जात असल्याची भूमिका आक्रमकपणे मांडण्यास प्रारंभ केला आहे. विविध घटनांचे दाखले देत यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या आमदारांना या प्रकरणातील तथ्य समजून घ्या अन् जगाला सांगा, असे निरोप दिले आहेत.