
कासा सायवन रस्ता दुरुस्ती काम सुरू
कासा, ता. २८ (बातमीदार) : कासा-सायवन या राज्य मार्गाच्या दुरूस्तीच्या कामास सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदाईचे काम सुरू झाले आहे. यामुळे या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे.
कासा-सायवन हा राज्य मार्ग येथील प्रमुख रस्त्यांपैकी एक असून या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या रस्त्याने सायवन, बापूगाव, उधवा, सिलवास, खानवेल येथील केंद्रशासीत प्रदेशात नागरीक ये जा करीत असतात. तसेच कासाहून गुजरातकडे जाणारा हा मार्ग असून येथून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनेही या रस्त्यावरून धावतात. त्यात कासा येथील या मार्गावर रस्त्यालगत दुकाने व रिक्षाथांबा असल्याने नेहमी वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
....
कासा मुख्य गावापासून ३५०मीटर पर्यंत या रस्त्याचे रुंदकरण केले जाणार आहे. तर सायवनपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे.
- मनीष चकदरे, अभियंता बांधकाम विभाग