Wed, Feb 8, 2023

काळू व शाई धरणास आमदार कथोरे यांचा विरोध
काळू व शाई धरणास आमदार कथोरे यांचा विरोध
Published on : 28 December 2022, 12:25 pm
मुरबाड, ता. २८ (बातमीदार) : ठाणे, मुंबईसाठी अत्यंत आवश्यक असलेले मुरबाड तालुक्यातील शाई धरण पूर्ण करण्यास आपला पूर्णपणे विरोध असल्याची भूमिका मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी घेतली आहे. विधानसभेमध्ये त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुरबाड व शहापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या काळू नदीवरील धरणाबाबत मात्र त्यांनी मवाळ भूमिका घेत धरणग्रस्त लोकांचे प्रथम पुनर्वसन करण्यात यावे नंतर धरणाचे काम करावे, असे सांगितले. शाई व काळू नदीवरील धरणामुळे मुरबाड तालुक्यातील सुमारे ३० गावे उठवावी लागणार आहेत. त्यामुळे लोकांचा धरण बांधण्यास विरोध आहे; तर भविष्यात ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील लोकांची तहान भागवण्यासाठी ही दोन्ही धरणे बांधणे गरजेचे असल्याने या कामाला सुरुवात करण्यात आली असून त्यांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.