ठाणे पोलिस सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे पोलिस सज्ज
ठाणे पोलिस सज्ज

ठाणे पोलिस सज्ज

sakal_logo
By

ठाणे, ता. २७ (वार्ताहर) : नव्या वर्षाचे स्वागत, सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आयुक्तालयाच्या हद्दीतील हॉटेल्स, धाबे, पर्यटनस्थळे आदी ठिकाणी मोठी गर्दी असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तालयात ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, वागळे परिमंडळात ठाणे पोलिसांनी जम्बो बंदोबस्ताचे नियोजन केल्याची माहिती विशेष शाखेचे सहाय्यक आयुक्त अनिल वाघमारे यांनी दिली. या बंदोबस्तात तब्बल ४०१२ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गर्दीच्या ठिकाणी हॉटेल्स, लॉज, धाबे आदी परिसर हा सीसी टीव्हीच्या अखत्यारित राहणार आहे. नव्या वर्षाच्या जल्लोषात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून हुल्लडबाजीवर आणि जल्लोषात सामील होणाऱ्या महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर पोलिसांची, भरारी पथकांची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी गर्दीच्या ठिकाणी सीसी टीव्हीचा तिसरा डोळाही कार्यरत राहणार आहे. जल्लोषात फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात होते.
-----------------------------------
आयुक्तालयाच्या हद्दीत बंदोबस्त
पोलिस अधिकारी ५००
पोलिस कर्मचारी, अंमलदार ३०००
वाहतूक शाखा अधिकारी ४२
पोलिस अंमलदार ४००
विशेष शाखा अधिकारी-अंमलदार ७०