मेंढवन येथे बर्निंग टँकरचा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेंढवन येथे बर्निंग टँकरचा थरार
मेंढवन येथे बर्निंग टँकरचा थरार

मेंढवन येथे बर्निंग टँकरचा थरार

sakal_logo
By

कासा, ता. २८ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मेंढवन येथील वळणावर टायर फुटून झालेल्या अपघातात टँकरला आग लागली. या आगीत टँकर जळून खाक झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर चार तास वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या केमिकलने भरलेल्या टँकरचा मेंढवन येथील वळणावर टँकर दुभाजकाला धडकून उलटला. यात टँकरचे टायर फुटून मोठा आवाज होत आग लागली. या अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती कळताच कासा पोलिस व महामार्ग पोलिस घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी बोईसर येथील अग्निशमन दलाच्या तुकडीस बोलावले. ही तुकडी दीड तासाने घटनास्थळी दाखल झाली, त्यानंतर आग विझवण्यास सुरुवात झाली. पण तोपर्यंत टँकर जळून खाक झाला होता. ही लागलेली आग सकाळी १० वाजेपर्यंत धुमसत होती. सकाळी वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली. या अपघातात टँकरमधील वाहन चालकासह इतर दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
.....
कासा : महामार्गावर मेंढवन येथील वळणावर अपघातात टँकरला आग लागून तो जळून खाक झाला.