शिक्षक संघटनेतर्फे आज राज्यस्तरीय शिक्षण परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक संघटनेतर्फे आज राज्यस्तरीय शिक्षण परिषद
शिक्षक संघटनेतर्फे आज राज्यस्तरीय शिक्षण परिषद

शिक्षक संघटनेतर्फे आज राज्यस्तरीय शिक्षण परिषद

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे नागपूर येथे एक दिवसीय राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे शुक्रवारी (ता. ३०) आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडामंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, झाशी राणी चौक, नागपूर येथे आयोजित या शिक्षण परिषदेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.
पंचायत राज समितीचे चेअरमन डॉ. संजय रायमुलकर हे या परिषदेचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. या एकदिवसीय शिक्षण परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, माजी मंत्री बच्चू कडू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या संयोजनाखाली होणाऱ्या या परिषदेस शिक्षक संघटना संघर्ष समितीचे समन्वयक प्रकाश घोळवे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. वस्ती शाळा शिक्षकांची नियुक्ती दिनांकापासूनची सेवा ग्राह्य धरून तेव्हापासून पूर्वलक्षी प्रभावाने त्यांना सर्व लाभ द्यावेत, राज्यातील २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील शिक्षकांची मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी या आणि अन्य शिक्षक परिषदेतील प्रमुख मागण्या असणार आहेत. नागपूर येथे होणाऱ्या या शिक्षण परिषदेत राज्यभरातून केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, वसतिशाळा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत उपस्थित राहता यावे यासाठी राज्य शासनाने प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी विशेष एक दिवसीय रजा मान्य केल्याची माहिती राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी दिली.