Tue, Jan 31, 2023

मुंब्य्रात शस्त्र दाखवून लाखाची लूट
मुंब्य्रात शस्त्र दाखवून लाखाची लूट
Published on : 28 December 2022, 11:55 am
कळवा, ता. २८ (बातमीदार) : मुंब्रा येथील दिवा रस्त्यावरील एका रक्त तपासणी लॅबमध्ये घुसून, शेजारी असलेल्या औषधाच्या दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून अज्ञात चार व्यक्तींनी एक लाख १३ हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना मंगळवारी घडली. मंगळवारी मुंब्रा दिवा रस्त्यावरील अनिल मोरे यांच्या रक्त तपासणी लॅबमध्ये अज्ञात चार व्यक्तींनी वॉचमनला शस्त्रांचा धाक दाखवून त्याच्याकडील १३ हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. शेजारी असलेल्या गगनगिरी या औषधाच्या दुकानात जाऊन दुकानाचे मालक अंकुश वेलवेकर यांना शस्त्रांचा धाक दाखवून एक लाख रुपये लुटल्याची घटना घडली. या अनोळखी व्यक्तीविरोधात मुंब्रा पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, मुंब्रा पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.