सक्रिय कोरोना रुग्णांत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सक्रिय कोरोना रुग्णांत वाढ
सक्रिय कोरोना रुग्णांत वाढ

सक्रिय कोरोना रुग्णांत वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : शहरात दोन दिवसांत सक्रिय कोविड -१९ रुग्णांमध्ये ३५ टक्के वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार २३ डिसेंबरपर्यंत ३७ सक्रिय रुग्ण होते, जे २५ डिसेंबरपर्यंत ५० झाले. दररोजच्या रुग्णांची संख्या १०च्या खाली होती. वरिष्ठ आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, हवामानातील बदलामुळे रुग्णांमध्ये किंचित वाढ होईल. सहव्याधी असलेल्या नागरिकांना सर्वांत जास्त त्रास होऊ शकतो. सध्या सर्वांमध्ये सौम्य लक्षणे आहेत.

तज्ज्ञांनी नागरिकांना कोविड-योग्य वर्तनाचे पालन करण्याचे आवाहन केले. सार्वजनिक ठिकाणी, सामाजिक आणि राजकीय मेळावे, कामाची ठिकाणे, धार्मिक स्थळे, क्रीडा कार्यक्रम, सभा, बाजार इत्यादींमध्ये किमान मास्क वापरणे आवश्यक आहे.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले की, घाबरण्याचे कारण नाही. कारण या वर्षी जूनमध्ये नोंदवलेल्या संख्येच्या तुलनेत संख्या खूपच कमी आहे. शहरात कोविड नियंत्रणात आहे आणि तो जाण्याच्या मार्गावर आहे. आम्ही (२७ डिसेंबर) सेव्हन हिल्स रुग्णालयात मॉक ड्रिल केले. आम्ही ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीनची कार्यस्थिती तपासली आहे. मनुष्यबळ आणि औषधांचा साठाही तपासला.
...
‘फोर टी’ची संकल्पना
सार्स कोविड-२ चे अनियमित वर्तन जाणून घेऊन, सावधगिरीचे उपाय करणे आणि सज्जतेसाठी मॉक ड्रिल करणे गरजेचे आहे. सरकारने ‘फोर टी’ची संकल्पना ठेवली आहे. टेस्ट, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि टीका म्हणजेच लसीकरण आणि याच्याच जोडीला जिनोम सिक्वेसिंग. घाबरण्याचे कारण नाही किंवा लॉकडाऊनसारखे कोणतेही कठोर पाऊल उचलण्याची गरज नाही, असे डॉ. ईश्वर गिलाडा म्हणाले.
...
चीनचा बीएफ.७ हा ओमिक्रॉनच्या इतर उपप्रकारांपेक्षा वेगळा नाही. वाहणारे नाक, घसा खवखवणे, ताप, खोकला, उलट्या, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी आणि अतिसार ही काही लक्षणे आहेत. गंभीर सहव्याधी असलेल्यांना हॉस्पिटलायझेशन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर सपोर्टची आवश्यकता लागू शकते.
- डॉ. ईश्वर गिलाडा, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ
...