कासा विद्यालयात क्रीडा महोत्सव साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासा विद्यालयात क्रीडा महोत्सव साजरा
कासा विद्यालयात क्रीडा महोत्सव साजरा

कासा विद्यालयात क्रीडा महोत्सव साजरा

sakal_logo
By

कासा, ता. २८ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील आचार्य भिसे विद्यालयामध्ये वार्षिक आंतरशालेय कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद ठाकूर यांनी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी अभ्यासाबरोबर शारीरिक व्यायम करणे गरजेचे आहे. खेळ व क्रीडा स्पर्धा आयोजित करणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे. आपल्या कलागुणांना वाव देण्याचे ते साधन आहे, असे सांगितले. यावेळी संस्थेचे सचिव आप्पासाहेब भोये, पांडुरंग बेलकर, खजिनदार राजेंद्र पागधरे, देऊ बालसी, सुरेंद्र पाटील, शैलेश राऊत, हितेंद्र पाटील, शाळेचे मुख्याध्यापक भरत ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य लतिका बालसी, पंचायत समिती सदस्य स्वाती राऊत, शालेय समिती सदस्य यतीन नम, दिलीप घोडा, गीता गुहे, उपसरपंच हरेश मुकणे आदी उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभासाठी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त जलतरणपटू शुभम वनमाळी उपस्थित होते.