बोईसर पोलिसांकडून दुचाकी चोराला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोईसर पोलिसांकडून दुचाकी चोराला अटक
बोईसर पोलिसांकडून दुचाकी चोराला अटक

बोईसर पोलिसांकडून दुचाकी चोराला अटक

sakal_logo
By

मनोर, ता. २८ (बातमीदार) : बोईसर पोलिसांना एका सराईत दुचाकी चोराला दुचाकीसह ताब्यात घेण्यात यश आले आहे. बोईसर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना विष्णू प्रभाकर गुप्ता (२६) या संशयीत तरुणाला दुचाकीसह ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता कागदपत्रे आढळून आली नाही. त्यामुळे त्याला पोलिसी बडगा दाखवताच त्याने ती दुचाकी चोरीची कबूली दिली. पोलिस तपासात त्याने अन्य एक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून ताब्यात घेतलेली दुचाकी अवधनगर परिसरात राहणाऱ्‍या रशीद उमर चौधरी यांच्या मालकीची आहे. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सुधाकर सुरळकर आणि गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.